शिक्षण संस्थाचालक संघटनेचा घंटानाद
By Admin | Updated: March 6, 2015 00:38 IST2015-03-06T00:38:55+5:302015-03-06T00:38:55+5:30
शिक्षण संस्थाचालक संघटनेचा घंटानाद

शिक्षण संस्थाचालक संघटनेचा घंटानाद
नाशिक : शिक्षण संस्थाचालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काल (दि.५) जिल्हा परिषदेसमोर शिक्षक संस्थाचालक संघटनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक महामंडळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर काल सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हे घंटानाद आंदोलन केले. विनाअनुदानित शाळा- महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे, शिक्षण संस्थांना मंजूर असलेले अनुदान तत्काळ देण्यात यावे, यासह शिक्षण संस्थाचालकांच्या विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर शिक्षण संस्थाचालक महामंडळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)