शिरवाडे वणी चौफुलीवर गतिरोधक बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 16:31 IST2020-09-09T16:30:40+5:302020-09-09T16:31:08+5:30
पिंपळगाव बसवंत : शिरवाडे वणी चौफुलीवरती असलेले गतिरोधक दबल्याने या चौफुलीवरती अपघात होण्याचे प्रमाण मोठया प्रमानात वाढले आहे.

शिरवाडे वणी चौफुलीवर गतिरोधक बसवा
ठळक मुद्देशिवेनेकडून टोलनाका व्यवस्थापकांना निवेदन
पिंपळगाव बसवंत : शिरवाडे वणी चौफुलीवरती असलेले गतिरोधक दबल्याने या चौफुलीवरती अपघात होण्याचे प्रमाण मोठया प्रमानात वाढले आहे. म्हणून या ठिकाणी गतिरोधक टाकून होणार्या अपघातांना आळा घालावा यासाठी टोल नाका व्यवस्थापक सागर देशमुख यांना निवेदन देऊन गतिरोधक लावण्याची मागणी शिवसेना ग्रामिण जिल्हाप्रमुख निलेश पाटील, पिंपळगाव शहर अध्यक्ष गणेश बनकर,बाळासाहेब आंबेकर, निलेश मोरे, रूपेश शिंदे, प्रितेश निफाडे, सुभाष निफाडे आदीनी केली आहे. (फोटो ०९ सेना)