साधू-साध्वींमध्ये कुप्रवृत्तीचा शिरकाव

By Admin | Updated: August 9, 2015 22:54 IST2015-08-09T22:54:41+5:302015-08-09T22:54:41+5:30

ब्रह्मचारिणी देवी : प्रणब कन्या संघातर्फे तोतयांचा निषेध

Inspired by sadhus and sadhvis | साधू-साध्वींमध्ये कुप्रवृत्तीचा शिरकाव

साधू-साध्वींमध्ये कुप्रवृत्तीचा शिरकाव

नाशिक : साधू-साध्वींमध्ये काही कुप्रवृत्तींच्या लोकांचा शिरकाव झाला आहे. वास्तविक साधू म्हणजे सर्व मोहमाया, लाभलोभापासून दूर गेलेल्या व्यक्ती; परंतु सध्याच्या काळात काही ढोंगी आणि तोतया साधू-साध्वी पैशांच्या बळावर प्रतिष्ठा व पदाच्या मोहाने या क्षेत्रात घुसतात. या घटनांचा आम्ही तीव्र विरोध करतो, अशा शब्दात प्रणब कन्या संघाच्या सहप्रमुख (पोर्टब्लेअर) येथील संन्यासिनी ब्रह्मचारिणी देवी यांनी निषेध व्यक्त केला.
पश्चिम बंगालमधील आचार्य स्वामी प्रणवानंदजी महाराज स्थापित प्रणब कन्या संघ या सेवाभावी संस्थेच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रथमच सहभागी होत विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या संस्थेच्या ब्रह्मचारिणीदेवी यांनी सांगितले की, साधू-साध्वी म्हणजे समाजाला धार्मिक व आध्यात्मिक विचार देऊन संस्कार करणारे लोक होय, परंतु सध्या वादग्रस्त राधे माँ आणि कथित सच्चिदानंदसारखे लोक समाजातील वातावरण बिघडवत आहेत. पुरुषांप्रमाणेच महिलांनादेखील संन्यासिनी होण्याचा अधिकार असून, त्यांना स्वतंत्र शाहीस्नानाचे स्थान असावे. परंतु याबाबत वाद होऊ नये. शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविला जावा, असेही त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे सिंहस्थ काळात प्रणब सेवा संघाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे देवी म्हणाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Inspired by sadhus and sadhvis