‘मविप्र’मध्ये प्रेरणा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:23 IST2018-04-05T00:23:03+5:302018-04-05T00:23:03+5:30

मराठा विद्या प्रसारक संस्थेचे दिवंगत सरचिटणीस डॉ. वसंत पवार यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने बुधवारी (दि.४) विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

 Inspiration Day in 'MVPR' | ‘मविप्र’मध्ये प्रेरणा दिन

‘मविप्र’मध्ये प्रेरणा दिन

नाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेचे दिवंगत सरचिटणीस डॉ. वसंत पवार यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने बुधवारी (दि.४) विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.  यानिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. येथील केटीएचएम महाविद्यालयात प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच मराठा हायस्कूलमध्येही पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांनी पवार यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती दिली. वावरे महाविद्यालयातही पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक नाना महाले उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, दत्ता पाटील, मधुकर पाटील, हिरामण कदम, डॉ. ए. के. शिंदे, डॉ. नितीन पाटील, प्रा. शंकरराव राजोळे आदी उपस्थित होते.

Web Title:  Inspiration Day in 'MVPR'