निरीक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण
By Admin | Updated: February 6, 2016 23:53 IST2016-02-06T23:46:12+5:302016-02-06T23:53:02+5:30
रुग्णालयात दाखल : इंदिरानगर पोलिसांची अशीही मर्दुमकी

निरीक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण
नाशिक : बोर्डाच्या तोंडी परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी शाळेत गेलेल्या दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांनी अमानुष मारहाण करून मर्दुमकी गाजविल्याचा प्रकार शनिवारी (दि़ ६) सकाळच्या सुमारास राणेनगरमधील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर घडला़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्या पालकांनी पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे़
राणेनगरमधील बिसमिल्ला मंजिलमध्ये राहणारा साकिब मुक्तारखान पठाण (१६) हा राणेनगरमधील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात आहे़ सोमवारपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या तोंडी परीक्षांचे वेळापत्रक शनिवारी शाळेत लावले जाणार होते़ शाळेत लावलेले हे वेळापत्रक पाहण्यासाठी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास साकिब शाळेत गेला होता़