गोदाकाठ भागात सैन्य दलाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 11:05 PM2021-07-26T23:05:12+5:302021-07-26T23:06:10+5:30

चांदोरी : इगतपुरी,त्रंबकेश्वर सह धरणग्रस्त क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाला की दारणा व गंगापूर धरणातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो या मुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात पूरपरिस्थिती निर्माण होत असते याच पार्श्वभूमीवर देवळाली कॅम्प सैन्यदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या समवेत चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समिती च्या स्वयंसेवकांनी संभाव्य पूर भागाची पाहणी केली.

Inspection of troops in Godakath area | गोदाकाठ भागात सैन्य दलाची पाहणी

गोदाकाठ भागात सैन्य दलाची पाहणी

Next
ठळक मुद्देचांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक सज्ज

चांदोरी : इगतपुरी,त्रंबकेश्वर सह धरणग्रस्त क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाला की दारणा व गंगापूर धरणातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो या मुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात पूरपरिस्थिती निर्माण होत असते याच पार्श्वभूमीवर देवळाली कॅम्प सैन्यदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या समवेत चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समिती च्या स्वयंसेवकांनी संभाव्य पूर भागाची पाहणी केली.

कोल्हापूर,सांगली,चिपळूण या भागात निर्माण झालेल्या भयंकर पूरपरिस्थिती च्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असावे या साठी देवळाली कॅम्प येथील लेफ्टनंट कर्नल ध्यानचंद व लेफ्टनंट सचिन सकपाळ व टीम सह चांदोरी,सायखेडा या पुरग्रस्त भागाला भेट दिली. चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ताब्यात असलेल्या शोध व बचाव कार्य करण्यासाठी असलेल्या साहित्याची पाहणी करत काही उपयुक्त सूचना केल्या.तसेच पूरपरिस्थिती मध्ये सुरक्षित ठिकाणाची पाहणी केली.

गावांचा संपर्क तुटल्या नंतर अन्न व औषध पुरवठा कोणत्या मार्गाने करता येईल याची चाचपणी करण्यात आली. याप्रसंगी माजी सैनिक तुषार खरात, उपसरपंच शिरीष गडाख,आपत्ती व्यवस्थापन समितिचे सागर गडाख,बाळू आंबेकर,फकिरा धुळे,विलास गांगुर्डे,किरण वाघ,विलास सूर्यवंशी,विलास गडाख आदी उपस्थित होते.

संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मदत कार्य करण्यासाठी सैन्य दला सोबत काम करण्यासाठी चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक सज्ज आहे.
-सागर गडाख (अध्यक्ष,आपत्ती व्यवस्थापन समिती चांदोरी.

सैन्य दलाच्या अनुभवाचे मार्गदर्शन घेत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीला सोबत घेऊन गोदाकाठ भागाची पाहणी करत सूचना केल्या.
- तुषार खरात (माजी सैनिक ) चांदोरी.
 
Web Title: Inspection of troops in Godakath area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.