ठाणगावी हिवताप पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:13+5:302021-07-04T04:11:13+5:30
डेंग्यू रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्यसेवक व आशा कार्यकर्ता व ग्रामपंचायत यांच्यावतीने ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे ...

ठाणगावी हिवताप पथकाकडून पाहणी
डेंग्यू रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्यसेवक व आशा कार्यकर्ता व ग्रामपंचायत यांच्यावतीने ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे अशा भागात पाण्यामध्ये अळ्या असणाऱ्या ठिकाणी अबेट औषधाची फवारणी करण्यात आली आहे की नाही, ज्या भागात डासांचे प्रमाण अधिक आहे अशा ठिकाणी ‘पायरी थम’ या औषधाची फवारणीची पाहणी केली. ग्रामपंचायत व आशासेविका यांच्या वतीने कोळीवाडा, ग्रामपंचायत परिसर, आदी भागात साचलेल्या पाण्यात ‘अबेटिंग’ वंगण टाकण्यात येऊन प्रतिबंधात्मक धुराळी हे उपाय राबविले जात आहेत. नागरिकांनी घरात जास्त पाणीसाठा करून ठेवू नये, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, गावातील खड्डे बुजविणे, पाणी वाहते ठेवणे, आदींबाबत सूचना पथकातील एस. एस. मेटकर यांनी दिल्या.