सप्तशृंगगडावरील प्रलंबित विकासकामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:37 PM2019-07-20T18:37:17+5:302019-07-20T18:37:43+5:30

सप्तशृंगगडावरील प्रलंबित विविध विकासकामांसाठी शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी जागेची पाहणी केली.

 Inspection of pending development works on Saptashringad | सप्तशृंगगडावरील प्रलंबित विकासकामांची पाहणी

सप्तशृंगगडावरील विविध विकासकामांसाठी जागेची पाहणी करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी. समवेत गटविकास अधिकारी डी.एम.बहिरम, उपसरपंच राजेश गवळी आदी.

Next
ठळक मुद्देएस. भुवनेश्वरी यांची भेट ; शिखर परिषद, विकास आराखड्यात मिळणार निधी

कळवण : तालुक्यातील सप्तशृंगगडावरील प्रलंबित विविध विकासकामांसाठी शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी
जागेची पाहणी केली. मुंबई येथे शिखर परिषदेत विकास आराखड्यात मंजुरी व निधी मिळणार असल्याने पाहणी केली आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक वर्षभरात हजेरी लावत असतात. या भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गेल्या तीन वर्षांपासून सप्तशृंगड ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश गवळी व माजी उपसरपंच गिरीश गवळी यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांच्या निधीसाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून प्रयत्न केले आहेत.
या दरम्यान वनविभागाकडून दहा एकर जमीन मिळविली आहे. या जागेवर शिवालय तलावाजवळ नवीन बस स्टॅण्ड, भक्त निवास, वणीच्या बाजूने गडावर येणारा पायी पायऱ्या, डोम, सीसीटीव्ही कॅमेरे, निवाराशेड, शौचालय, भवानी पाझर तलावाची संपूर्ण नवीन पाइपलाइन, परशुराम बाला मार्ग ते तांबूल तीर्थमार्ग, गावांतर्गत रस्ते, तीन टीएमसीचे नवीन लपा प्रकल्प, नक्षत्र गार्डन, प्रवेशद्वार कमान, व्यापारी गाळ्यांवरील डोम या कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई येथे मंत्रालयात विकास आराखड्याबाबत होणाºया शिखर
परिषद बैठकीत माहिती देण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी जागेची पाहणी केली. यावेळी कळवणचे गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम, सरपंच सुमनबाई
सूर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, सदस्य गिरीश गवळी, ग्रामविकास अधिकारी आर.बी. जाधव यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. गडावर लवकरच विविध विकासकामांना सुरुवात होणार आहे.

Web Title:  Inspection of pending development works on Saptashringad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.