आमदार कांदे यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 00:02 IST2021-09-09T00:01:17+5:302021-09-09T00:02:09+5:30
नांदगाव : शहरातील नद्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा नगरविकास विभागामार्फत विशेष निधी उपलब्ध करून देण्यासोबत अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. आमदार कांदे यांनी बुधवारी (दि.८) शहरातील पुरामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

आंबेडकर चौकातील व्यावसायिकाचे अतोनात नुकसान झाले. त्याची पाहणी करताना आमदार सुहास कांदे.
नांदगाव : शहरातील नद्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा नगरविकास विभागामार्फत विशेष निधी उपलब्ध करून देण्यासोबत अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. आमदार कांदे यांनी बुधवारी (दि.८) शहरातील पुरामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
गुलजारवाडी, गांधी चौक, आंबेडकर चौक व लेंडी नदीपात्राची पाहणी करीत, झालेल्या व्यावसायिक नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांनी धीर दिला, विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तोही विषय मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती कांदे यांनी दिली. यावेळी तालुकाप्रमुख किरण देवरे, सुनील जाधव, सागर हिरे आदी उपस्थित होते.