खेडगावच्या पेयजल योजनेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:27+5:302021-07-09T04:10:27+5:30

रोहयो अंतर्गत केलेली फळबाग, आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाची पाहणी करुन काम पूर्ण करणेबाबत ठेकेदार यांना सूचना दिल्या. पशुवैद्यकीय ...

Inspection of Khedgaon drinking water scheme | खेडगावच्या पेयजल योजनेची पाहणी

खेडगावच्या पेयजल योजनेची पाहणी

रोहयो अंतर्गत केलेली फळबाग, आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाची पाहणी करुन काम पूर्ण करणेबाबत ठेकेदार यांना सूचना दिल्या. पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम पाहणी करुन वाॅल कंपाउंड बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक पाठविणेबरोबरच ग्रामपंचायत खेडगाव गांडूळखत प्रकल्प, ग्रामपंचायत विकास कामे स्थिरीकरण तळे, सांडपाणी व्यवस्थापन व पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कामाची पाहणी केली.

ढकांबे येथे पेव्हर ब्लॉक, हायमास्ट कामे, जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी व अनुषंगिक कामे, प्राथमिक शाळा येथे भेट देऊन शालेय पोषण आहार वाटप बाबतीत माहिती घेऊन सूचना दिल्या. ग्रामपंचायत दप्तर पाहणी केली.

तळेगाव दिंडोरी आरोग्य केंद्र दुरुस्ती काम पाहणी केली. यावेळी खेडगाव जि. प. सदस्य भगरे, सरपंच दत्तात्रय पाटील, सदस्य व ग्रामस्थ हजर होते.

-----------------------

खेडगाव येथे कामाची पाहणी करताना रवींद्र शिंदे, भास्कर भगरे, दत्तात्रय पाटील, सोमनाथ ढोकरे आदी. (०८ खेडगाव)

080721\08nsk_5_08072021_13.jpg

०८ खेडगाव

Web Title: Inspection of Khedgaon drinking water scheme