फडणवीस यांच्याकडून रुग्णालयांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST2021-05-01T04:14:14+5:302021-05-01T04:14:14+5:30
नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर ...

फडणवीस यांच्याकडून रुग्णालयांची पाहणी
नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी दुपारी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर ते बिटको रुग्णालयात रवाना झाले. रुग्णालयातील सीटी स्कॅन व एमआरआय मशीन, ऑक्सिजन प्लांटला भेट दिली. यावेळी नातेवाइकांनी रुग्णालयात नियमित स्वच्छता होत नाही, दर्जेदार जेवण मिळत नाही, औषधांची व डॉक्टरांची टंचाई असल्याची तक्रार केली. फडणवीसांनी रुग्णांना मदतीचे आश्वासन दिले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार भारती पवार, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बोरसे, महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, गटनेते जगदीश पाटील, हेमंत गायकवाड आदी उपस्थित होते. (फोटो आहे)