सिंघल, रानडे यांच्याकडून गोदाघाटाची पाहणी

By Admin | Updated: September 7, 2015 00:35 IST2015-09-07T00:33:05+5:302015-09-07T00:35:22+5:30

सिंघल, रानडे यांच्याकडून गोदाघाटाची पाहणी

Inspection of Godaghat by Singhal, Ranade | सिंघल, रानडे यांच्याकडून गोदाघाटाची पाहणी

सिंघल, रानडे यांच्याकडून गोदाघाटाची पाहणी

नाशिक : सिंहस्थाच्या दुसऱ्या पर्वणीतील बंदोबस्तासाठी खास नेमणूक करण्यात आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) रवींद्र सिंघल व पुणे येथील पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी रविवारी (दि़६) सायंकाळी पोलीस अधिकाऱ्यांसह गोदाघाटाची पाहणी केली़
पहिल्या पर्वणीत गर्दी नसतानाही पोलिसांनी नाशिककर व भाविकांवर बंदोबस्त तसेच बॅरिकेडिंगचा अतिरेक केल्यामुळे सर्वत्र टीकेचा सूर आळवला गेला़ यानंतर पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्याकडे पत्रकारांनी गत सिंहस्थातील अनुभवी अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी नाशिकला पाठविण्याबाबत विचारणा केली होती़
पोलीस महासंचालकांनी रवींद्र सिंघल व मकरंद रानडे यांची दुसऱ्या व तिसऱ्या पर्वणीच्या बंदोबस्तासाठी खास नेमणूक केली असून, हे दोघेही शहरात दाखल झाले आहेत़ या दोघांनी पंचवटी परिसरातील रामकुंड, गोदाघाट, तसेच शाहीमार्ग या परिसराची पाहणी
केली़
त्याच्यासमवेत पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसारे व अधिकारी वर्ग उपस्थित होता़ यावेळी त्यांनी उपस्थितांना विविध सूचना केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Inspection of Godaghat by Singhal, Ranade