आयुक्तांकडून खतप्रकल्पाची पाहणी
By Admin | Updated: July 26, 2016 00:31 IST2016-07-26T00:31:05+5:302016-07-26T00:31:19+5:30
आयुक्तांकडून खतप्रकल्पाची पाहणी

आयुक्तांकडून खतप्रकल्पाची पाहणी
नाशिक : महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अभिषेक कृष्ण यांनी सर्वांत कळीचा मुद्दा बनलेल्या खतप्रकल्पाची पाहणी करून माहिती जाणून घेतली. याशिवाय आयुक्तांनी पाणीपुरवठा केंद्रांनाही भेटी दिल्या.
खतप्रकल्पाच्या दुरवस्थेवरून वारंवार महापालिकेला टीकेला सामोरे जावे लागत आहे, शिवाय राष्ट्रीय हरित लवादानेही खतप्रकल्पाच्या दुरवस्थेमुळे शहरातील बांधकाम परवानग्यांना रोख लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर अभिषेक कृष्ण यांनी खतप्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली. कचरा संकलन आणि विल्हेवाट याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर आयुक्तांनी गंगापूर धरण येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र यांनाही भेटी दिल्या. यावेळी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा यंत्रणेची माहिती अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी दिली. भेटीप्रसंगी कार्यकारी अभियंता बी. जी. माळी, ए. व्ही. धनाईत आदि उपस्थित होते.