३३ हजार रुग्णांची तपासणी
By Admin | Updated: March 18, 2017 23:52 IST2017-03-18T23:51:29+5:302017-03-18T23:52:58+5:30
नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याने आतापर्यंत ३३ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, उपचारासाठी पाच कक्षांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

३३ हजार रुग्णांची तपासणी
नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याने आतापर्यंत ३३ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, उपचारासाठी पाच कक्षांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
नाशिक जिल्ह्णात स्वाइन फ्लूचे सतरा रुग्ण आढळले. त्यातील दहा रुग्ण नाशिक जिल्ह्णातील असून, उर्वरित परजिल्ह्णातील रहिवासी आहेत. त्यापैकी चार रुग्ण स्वाइन फ्लूमुळे दगावले आहेत. अन्य रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालय, महापालिकेच्या कथडा हॉस्पिटल, बिटको रुग्णालय, कळवण याठिकाणी स्वाइन फ्लू कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी संसर्गापासून बचाव करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.