येवला : अशोक सर्वांगीन सोसायटी (पुणे) संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक शीलवंत (वय59) यांचे निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या येथील अशोकस्तंभ शिलालेखात त्यांचे अस्थिस्थापन करण्यात आले.सम्राट अशोकाचे पाईक असलेले डॉ. अशोक शीलवंत हे खर्या अर्थाने त्यांचा वारसा पुढे नेणारे होते. म्हणून त्यांनी समाज प्रबोधना बरोबरच तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा बौद्धधम्म सम्राट अशोकांनी दिक्षा घेतल्या नंतर अहींसेचा मार्ग अवलंबला व ८४००० स्तूप व १४ शिलालेख स्थापन केले. ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांचे जीवनाशी निगडित असलेल्या महत्वाचे होते. अगदी त्याच प्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये जे ठिकाण महत्वाचे आहे अश्या १४ ठिकाणी अशोकस्तंभ शिलालेख स्थापन करण्याचे ध्येय बाळगून शीलवंत यांनी लोणावळा, रत्नागिरि, येवला, आग्रा, सन्नती (कर्नाटक), कोल्हापुर, नागपुर, गोंदिया अश्या आठ ठिकाणी शिलालेख स्थापन केले. येवला येथे त्यांनी ४था शिलालेख हा १२ एप्रिल २०११ रोजी स्थापन केला. या पार्श्वभूमीवर त्यांचे अस्थिस्थापन या शिलालेखात करण्यात आल्या. बाकीच्या सहा ठिकाणी त्यांचा मुलगा राजरत्न शीलवंत हे स्वतः पूर्ण करणार आहेत.येथे राजेंद्र बनसोडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत अशोक शिलवंत यांना अभिवादन केल्या गेले. सूत्रसंचालन शंकर जाधव यांनी तर आभार प्रदर्शन अनिल जगताप यांनी केले.कार्यक्रमास समाधान पगारे, रोहिदास गायकवाड़, सुभाष गांगुर्डे, रविराज गोतीस, मछिन्द्र आहेर, अभिमन्यु शिरसाठ, संजय गरुड, प्रल्हाद जगताप, महेंद्र पगारे, संतोष लाठे ,सिद्धार्थ त्रिभुवन, गौतम लाठे, संतोष आहेर, सागर हिरे, मिलिंद पगारे, मिलिंद गांगुर्डे, आकाश भालेराव, युवराज पगारे, गोरख गांगुर्डे आदि समाज बांधव उपस्थित होते.
येवल्यातील शिलालेखात अशोक शिलावंतच्या अस्थिस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:06 IST
येवला : अशोक सर्वांगीन सोसायटी (पुणे) संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक शीलवंत (वय59) यांचे निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या येथील अशोकस्तंभ शिलालेखात त्यांचे अस्थिस्थापन करण्यात आले.
येवल्यातील शिलालेखात अशोक शिलावंतच्या अस्थिस्थापन
ठळक मुद्देयेवला येथे त्यांनी ४था शिलालेख हा १२ एप्रिल २०११ रोजी स्थापन