शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
7
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
8
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
9
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
10
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
11
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
12
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
13
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
14
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
15
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
16
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
17
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
18
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
19
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
20
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

नाशिक महापालिकेच्या मागासांच्या अखर्चित निधीबाबत चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:08 IST

नाशिक :  महापालिकेच्या अंदाजपत्रकात दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी तीन टक्के तरतूद असते. मात्र त्याचा खर्चच होत नसल्याच्या तक्रारीवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडौले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी तक्रार केली होती.

ठळक मुद्दे महापालिकेला दणका राजकुमार बडोले यांनी मागितला अहवाल

नाशिक महापालिकेच्या अंदाजपत्रकात दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी तीन टक्के तरतूद असते. मात्र त्याचा खर्चच होत नसल्याच्या तक्रारीवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडौले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी तक्रार केली होती.

महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय नागरिकांची लोकसंख्या आहे. या नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनदेखील महापालिकेला निधी देत असते शिवाय महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र सदरचा निधी महापालिकेकडून खर्च केला जात नाही. २०१६-१७ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या वतीने ६ कोटी ६३ लाख ४२ हजार शासनाने महापालिकेकडे वर्ग केले आहेत. त्यापैकी केवळ ७७ लाख ९९ हजार रुपये खर्ची पडल्याचे दिसत आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात दहा कोटी दहा लाख ९७ हजार रुपयांचा निधी महापालिकेस प्राप्त झाला त्यापैकी केवळ एक कोटी ८२ लाख रुपयांचा निधी खर्च झाला, अशी दिवे यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली.

शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत २०१७-१८ करिता तीन टक्केनिधी अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनांसाठी दोन कोटी रुपयांचे आदेश दिले होते. मात्र असे प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. त्यामुळे निधी शासनाकडे परत गेला आणि या निधीचा मागासवर्गीय समाजाला लाभ झाला नाही, अशी तक्रारही दिवे यांनी केली. त्यावर समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना याबाबत चौकशी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSocialसामाजिक