शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

महिला रूग्णांच्या हेळसांड प्रकरणाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:14 IST

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्याप्रकरणी आरोग्य ...

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्याप्रकरणी आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून, तत्काळ चौकशी अहवाल सादर करुन या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झालेल्या स्त्री रुग्णांना दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात हलविण्याच्या सूचनाही गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. कोरोनामुळे जिल्हयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर डिसेंबरपासून जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा नियमित स्वरुपाचा कार्यक्रम असून, एप्रिल ते मार्चपर्यंत नियमित स्वरुपात याची अंमलबजावणी करण्यात येते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी ४१ महिलांनी नोंदणी केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बेडच्या उपलब्धतेबाबत रुग्णांना पूर्वकल्पना दिली होती. मात्र, बेडअभावी काही स्त्री रुग्णांची गैरसोय झाल्याचे निर्दशनास आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्यामार्फत याबाबत चौकशीचे आदेश दिले असून, शुक्रवारी (दि. २२) सायंकाळपर्यंत चौकशी करुन सबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात दाखल करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.