जळगावचे प्रमुख वाळू ठेकेदार मिश्रांची चौकशी

By Admin | Updated: November 17, 2015 22:54 IST2015-11-17T22:53:47+5:302015-11-17T22:54:41+5:30

सादरे आत्महत्त्या प्रकरण : चार तास चौकशी

Inquiries of major sand contractor Mishra of Jalgaon | जळगावचे प्रमुख वाळू ठेकेदार मिश्रांची चौकशी

जळगावचे प्रमुख वाळू ठेकेदार मिश्रांची चौकशी

नाशिक : रामानंदनगरचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्येप्रकरणी मंगळवारी (दि़१७) राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी जळगावमधील प्रमुख वाळू ठेकेदार राजेश मिश्रा यांची सुमारे चार तास चौकशी केली़ या प्रकरणात सीआयडीने समन्स बजावलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक ललित कोल्हे यांची बुधवारी (दि़ १८) चौकशी केली जाणार आहे़
सादरे आत्महत्त्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यापूर्वी या तिघांविरुद्ध समन्स बजावण्यात आले होते़ या तिघांनाही सीआयडीने चौकशीसाठी बोलावले असून, सोमवारी रवींद्र चौधरी यांची सहा तास, तर मंगळवारी राजेश मिश्रा यांची चार तास चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले़
या चौकशीत सागर चौधरी हा आपल्याकडे पंधरा हजार रुपये पगारावर काम करीत असल्याचे तसेच या गुन्ह्याशी तसेच या दोघांशीही आपला संबंध नसल्याचे मिश्राने तपासी अधिकाऱ्यांना सांगितले़
बुधवारी मनसे नगरसेवक ललित कोल्हे यांचा जबाब झाल्यानंतर सीआयडीचे पथक शुक्रवारी (दि़ २०) जळगावला तपासासाठी जाणार आहे़ यानंतर या चौकशीचा अहवाल सीआयडीचे अपर महासंचालकांना सादर केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)
दुचाकी अपघातात एक ठार
वडाळीभोई : वडाळीभोई शिवारात पिंपळगावकडून चांदवडकडे येणारी मोटारसायकल क्रमांक एम.एच. १५ ई.बी. २४२६ हिचे चालक दगू बबन माळी (५७) रा.पिंपळगावनजीक, ता. निफाड यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने ते जागीच ठार झाले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत वडाळीभोई पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलसी निरीक्षक चंदन ईमले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बोरसे हे करीत आहेत. (वार्ताहर )

Web Title: Inquiries of major sand contractor Mishra of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.