शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

मागासांच्या अखर्चित निधीबाबत चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:58 IST

महापालिकेच्या अंदाजपत्रकात दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी तीन टक्के तरतूद असते. मात्र त्याचा खर्चच होत नसल्याच्या तक्रारीवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी तक्रार केली होती.

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी तीन टक्के तरतूद असते. मात्र त्याचा खर्चच होत नसल्याच्या तक्रारीवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी तक्रार केली होती.महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय नागरिकांची लोकसंख्या आहे. या नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनदेखील महापालिकेला निधी देत असते शिवाय महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र सदरचा निधी महापालिकेकडून खर्च केला जात नाही. २०१६-१७ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या वतीने ६ कोटी ६३ लाख ४२ हजार शासनाने महापालिकेकडे वर्ग केले आहेत. त्यापैकी केवळ ७७ लाख ९९ हजार रुपये खर्ची पडल्याचे दिसत आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात दहा कोटी दहा लाख ९७ हजार रुपयांचा निधी महापालिकेस प्राप्त झाला त्यापैकी केवळ एक कोटी ८२ लाख रुपयांचा निधी खर्च झाला, अशी दिवे यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली.  शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत २०१७-१८ करिता तीन टक्केनिधी अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनांसाठी दोन कोटी रुपयांचे आदेश दिले होते. मात्र असे प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. त्यामुळे निधी शासनाकडे परत गेला आणि या निधीचा मागासवर्गीय समाजाला लाभ झाला नाही, अशी तक्रारही दिवे यांनी केली. त्यावर समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना याबाबत चौकशी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.अंदाजपत्रकात निधी राखीवनागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनदेखील महापालिकेला निधी देत असते शिवाय महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र सदरचा निधी महापालिकेकडून खर्च केला जात नाही. २०१६-१७ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या वतीने ६ कोटी ६३ लाख ४२ हजार महापालिकेकडे वर्ग केले आहेत. त्यापैकी केवळ ७७ लाख ९९ हजार रुपये खर्ची पडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाfundsनिधी