भुजबळांची निर्दोष मुक्तता; येवल्यात आनंदोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST2021-09-10T04:20:50+5:302021-09-10T04:20:50+5:30
शहरातील विंचूर चौफुली येथे समता परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व पेढे वाटून भुजबळ यांच्या मुक्ततेचा ...

भुजबळांची निर्दोष मुक्तता; येवल्यात आनंदोत्सव साजरा
शहरातील विंचूर चौफुली येथे समता परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व पेढे वाटून भुजबळ यांच्या मुक्ततेचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, बाळासाहेब लोखंडे, भगवान लोंढे, साहेबराव आहेर, सुनील पैठणकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक लोणारी, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, भूषण लाघवे, संतोष खैरनार, सचिन सोनवणे, सुमित थोरात, निसार निंबुवाले, मुश्ताक शेख, भाऊसाहेब कळसकर, गणेश गवळी, संदीप बोढरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर अंदरसुल येथील महात्मा ज्योतिराव फुले चौक येथेही भुजबळ समर्थकांनी पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी अंदरसुल उपबाजार समितीचे माजी सभापती मकरंद सोनवणे, भीमाशंकर वाघचौरे, राजू सोनवणे, मुनिर शेख, केदार शिनगारे, साहेबु जाधव, सुमित घोंगाणे, कैलास परदेशी आदी उपस्थित होते.
फोटो- ०९ येवला भुजबळ
येवला येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करताना भुजबळ समर्थक.
090921\09nsk_41_09092021_13.jpg
फोटो- ०९ येवला भुजबळ येवला येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करताना भुजबळ समर्थक.