जखमी करकोचा पक्ष्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:45 IST2020-06-06T21:03:33+5:302020-06-07T00:45:27+5:30
नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात शनिवारी (दि.६) टॉवरवरून पडून जखमी अवस्थेत आढळून आलेल्या काळा करकोचा पक्ष्याला जीवदान मिळाले आहे. त्याच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करून वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

जखमी करकोचा पक्ष्याला जीवदान
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात शनिवारी (दि.६) टॉवरवरून पडून जखमी अवस्थेत आढळून आलेल्या काळा करकोचा पक्ष्याला जीवदान मिळाले आहे. त्याच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करून वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.
येथील होळी चौकात गेल्या काही वर्षांपासून एका मोबाइल कंपनीचा टॉवर असून, टॉवरवर अनेक प्रकारचे पक्षी राहतात. त्यापैकी करकोचा पक्षी मोठ्या आवाजाने नागरिकांना आकर्षित करतात. त्यातील एक करकोचा पक्षी उडताना त्याच्या पंखात दोरा किंवा वायर अडकून जखमी अवस्थेत रमेश नथू सुरसे यांच्या घराशेजारील पडीक वाड्यात निदर्शनास आला. सुरसे यांचा मुलगा रोहितचे त्याकडे लक्ष गेले. त्याला जखमा झाल्याचे पाहून सुरसे पितापुत्रांनी त्या पक्ष्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. डॉ. संजय मोकळ यांनी उपचार करून वनविभागाचे वनरक्षक एन. के. राठोड यांना बोलवले.