दोघा बहिणींचा दीक्षा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:16 IST2021-07-07T04:16:50+5:302021-07-07T04:16:50+5:30

घोटी शहरातून जैनस्थानक ते आनंद उमेश दरबार, चोरडिया भवनपर्यंत मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. "दीक्षार्थी की जयजयकार" , ...

Initiation ceremony of two sisters | दोघा बहिणींचा दीक्षा सोहळा

दोघा बहिणींचा दीक्षा सोहळा

घोटी शहरातून जैनस्थानक ते आनंद उमेश दरबार, चोरडिया भवनपर्यंत मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. "दीक्षार्थी की जयजयकार" , "जैन धर्म की जय हो" अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या साेहळ्यात महाराष्ट्रातील जैन समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. घोटीतील उद्योजक पारस चोरडिया यांच्या दोन्ही कन्या मुमुक्षु खुशबुबेन, मुमुक्षु श्वेताबेन यांनी दीक्षा घेतली आहे. सोहळ्याला अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. घोटी जैन स्थानकवासी श्रावक संघाचे संघपती नंदकुमार शिंगवी व संजय चोरडिया यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शोभायात्रेनंतर दीक्षार्थींचा कुंकूम समारंभ, केशर छाटणा, गौतमप्रसादी, भावरक्षाबंधन, भक्तिसंध्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जैन कॉन्फरन्स महाराष्ट्रचे अध्यक्ष ललित मोदी, ग्यानगछ शाखेचे अध्यक्ष विजय गोगड, आनंद साभद्रा, किसनलाल पिचा, नवसुखलाल पिचा, उमेद पिचा आदी उपस्थित होते.

फोटो- ०५ घोटी दीक्षा

050721\05nsk_41_05072021_13.jpg

फोटो- ०५ घोटी दीक्षा 

Web Title: Initiation ceremony of two sisters