शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इंदोरे येथे घरकुल बांधणी माहिती व मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 18:32 IST

गाव महाराष्ट्र ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये इगतपुरी तालुक्यातील इंदोरे गावाचा समावेश असून, गावात यानिमित्ताने घरकुल बांधणी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या आर्थिक वर्षात तब्बल ८० लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहेत.

घोटी : गाव महाराष्ट्र ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये इगतपुरी तालुक्यातील इंदोरे गावाचा समावेश असून, गावात यानिमित्ताने घरकुल बांधणी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या आर्थिक वर्षात तब्बल ८० लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहेत. इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी मार्गदर्शन करतांना इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक घरकुल मंजूर असणारे गाव इंदोरे असल्याचे सांगितले.या बैठकीत घरकुल योजनेंतर्गत आलेले अनुदान किती टप्प्यात मिळणार व ते कसे वापरावे हे सांगितले. गाव कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असल्यामुळे घरकुल तसेच शौचालय व शोषखड्डा बांधताना भविष्याचा विचार करून जर पर्यटक आणि गिर्यारोहक यांच्यासाठी एक रूम जास्तीची काढली तर तिच रूम पर्यटकांसाठी निवारा व मुक्कामाचे साधन होईल. त्यामुळे भविष्यात उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे, विस्तार अधिकारी संजय पवार, सरपंच जनार्दन शेणे, ग्रामसेवक संदीप वसावे, ग्राम परिवर्तक किशोर राक्षे, सदस्य पंढरीनाथ धादवड, नथू पिचड तसेच गावातील पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकblock development officerगटविकास अधिकारी