गुन्हेगारांबाबत माहिती कळवावी
By Admin | Updated: December 23, 2016 00:49 IST2016-12-23T00:48:46+5:302016-12-23T00:49:01+5:30
पंचवटी पोलीस ठाणे : तत्काळ दखल घेणार

गुन्हेगारांबाबत माहिती कळवावी
पंचवटी : परिसरात कायदा, शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यामार्फत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची कारवाई केली जात असून, परिसरात अजूनही काही गुन्हेगार टोळीशी संबंधित असलेले तसेच परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांबाबत नागरिकांनी माहिती कळवावी, असे आवाहन पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी केले आहे.
गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी पोलीस ठाण्यामार्फत दिवसा व रात्रीच्या गस्तीवर अधिक भर दिला जात आहे. पंचवटी परिसरात अजूनही काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके नागरिकांना त्रास देणे, दहशत निर्माण करणे, धमकी देणे, तसेच अन्य गुन्हेगारांना मदत करणारे पोलिसांच्या रडारवर असून, त्यांची नावे पोलिसांनी जमा करण्याचे काम सुरू केले आहे.