राजकारणाचा सर्वच क्षेत्रात प्रभाव
By Admin | Updated: January 21, 2016 22:48 IST2016-01-21T22:47:24+5:302016-01-21T22:48:38+5:30
जयदेव डोळे : केटीएचएम महाविद्यालयात चर्चासत्र

राजकारणाचा सर्वच क्षेत्रात प्रभाव
नाशिक : राजकारण माध्यमातूनच येते असे नाही ते आपल्या अवतीभोवती असते. सर्व क्षेत्रामध्ये आणि संस्थांमध्ये राजकारणाचा प्रभाव असतो. राजकारण म्हणजे संवाद, असे प्रतिपादन औरंगाबाद विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे निवृत्त प्रा. जयदेव डोळे यांनी केले.
केटीएचएम महाविद्यालयाच्या पत्रकारिता, राज्यशास्त्र व मानसशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘मानसशास्त्रीय प्रभाव : निवडणूक व माध्यमे’ या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रा. डोळे बोलत होते. आपली लोकशाही अजूनही माध्यमांकित झालेली नाही, मात्र दूरचित्रवाणी वाहिन्यांनी देशाचा व राजकारणाचा ताबा घेतला आहे. प्रत्येक व्यक्ती निवडणुकीत स्वत:चे मत स्वत: ठरवीत असते, असेही डोळे यांनी सांगितले .
यावेळी पत्रकारिता विभागाच्या समन्वयक प्रा. प्राची पिसोळकर, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. कल्पना अहिरे, मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. रुबी पवार, प्रा. अशोक सोनवणे, प्रा. सुवर्णा धामणे, प्रा. सोनाली पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)