भावा-बहिणीच्या प्रेमाला महागाईचा फटका

By Admin | Updated: August 6, 2014 02:01 IST2014-08-06T01:33:11+5:302014-08-06T02:01:27+5:30

भावा-बहिणीच्या प्रेमाला महागाईचा फटका

Influence of brother and sister love inflation | भावा-बहिणीच्या प्रेमाला महागाईचा फटका

भावा-बहिणीच्या प्रेमाला महागाईचा फटका

 

नाशिक : बहीण-भावामधील अतूट नात्याच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाला केवळ काही दिवसच बाकी असल्याने बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये कार्टून, चमकी या पारंपरिक राख्यांसहित धातूच्या राख्या आणि पंतप्रधान मोदींचा मुखवटा असलेल्या राख्याही उपलब्ध झाल्या आहेत.
मेनरोड आणि भद्रकाली, पंचवटी तसेच उपनगरांत विविध ठिकाणी राख्यांची दुकाने थाटली गेली आहेत. यंदा राख्यांमध्ये नियमित राख्यांबरोबरच १५० नवीन प्रकार दाखल झाले आहेत. त्यात पेन विथ लाइट (५५ रु.), स्पायडरमॅन (२१ ते ४० रु.), मकडी (४५ रु.), पेंग्वीन (७० रु.), कार्टून किचन (२५ रु.), अ‍ॅनिमेटेड गणेशा (४० रु.), स्पार्कलिंग लाइट राखी, मिकीमाउस (१५ ते ५० रु.), टेडीबेअर (५ ते ५० रु.), हनुमान, धूमबाइक, मोबाइल, स्मार्टफोन, किल्लीची गाडी, खोपडी, धूम थ्री, चेन्नई एक्स्प्रेस यांसारख्या असंख्य प्रकारच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत.
रक्षाबंधनाच्या दिवशी राखीचा आनंद घ्यायचा आणि नंतर छानपैकी ही आपली आवडती खेळणी खेळायची असा दुहेरी लाभ मुलांना मिळणार आहे. यावर्षी लहान मुलांसाठी निर्माण झालेल्या चित्रपटातील पात्रांचा त्यांना पूर्ण आनंद घेता येणार आहे. महिलांसाठीदेखील लुंबा नावाच्या सप्तरंगी लोंबत्या राख्या बाजारात आल्या असून, २५ ते ५० रुपये दराने त्या मिळत आहेत. याशिवाय जरदोसी वर्क, रुद्राक्ष, मोरपिसे, शंख, स्टोन, मोती, चांदी, रेशमी धागे आदिंचा वापर करून तयार केलेल्या राख्याही दुकानांमध्ये पाहायला मिळत आहेत. या राख्या डझनाच्या स्वरूपात घेतल्या जात असून, ५६ रुपये डझन, ५० रुपये डझन या दराने मिळत आहेत. रुद्राक्ष, ओम, रेशीम गोंड्याच्या राख्या यांनाही चांगली मागणी आहे.
कोलकाता, मुंबई, संदूर या ठिकाणांहून राख्या उपलब्ध होत असून, वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्याचा फटका राख्यांच्या किमतीला बसला आहे. त्यामुळे किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Influence of brother and sister love inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.