पोळा सणावर महागाईचे सावट

By Admin | Updated: August 15, 2014 00:34 IST2014-08-14T01:46:30+5:302014-08-15T00:34:59+5:30

पोळा सणावर महागाईचे सावट

Inflation of inflation on poles | पोळा सणावर महागाईचे सावट

पोळा सणावर महागाईचे सावट

पोळा सणावर महागाईचे सावट येवला : पोळा सण शेतकरीवर्ग उत्साहाने साजरा करत असतात. यावर्षी सोमवारी (दि. २५) पोळा सण साजरा होणार आहे. त्याची तयारी ग्रामीण भागात एव्हाना सुरू झाली असून, ग्रामीण भागात कुंभार बांधवांची मातीचे बैल बनवण्याची एकच लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, यंदा सणावर महागाईचे सावट आहे.
ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातसुद्धा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. येवल्याच्या मानाच्या बैलजोडीचा मान परंपरेने माणिकराव शिंदे पाटील यांच्या बैलजोडीचा असतो. शहरातून या बैलजोडीची मिरवणूक काढली जाते. शेतातल्या बैलांबरोबर मातीच्या बैलांचेदेखील पूजन घराघरात केले जाते. परंतु या वर्षी बळीराजाला मातीच्याच बैलांची पूजा करण्याची वेळ येणार आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या हंगामात अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे चारावर्गीय पिकांचे झालेले नुकसान होय. त्यानंतर चालू हंगामात लांबलेल्या पावसामुळे जनावरांना चाऱ्याची कमतरता व महागाई यामुळे ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी जीवा-शिवाची बैल जोड विकून यांत्रिक मशागतीने शेती उभी केली आहे.
येवल्याच्या ग्रामीण भागात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्के बैलांची संख्या घटली आहे. त्यामुळे यावर्षी पोळा सणावर महागाईचे सावट राहणार आहे. असे असले तरी मातीच्या बैलांच्या पूजेला शहरासह ग्रामीण भागातदेखील महत्त्व आहे. म्हणूनच १० ते १५ दिवस आधी येवल्याच्या ग्रामीण भागात मातीचे बैल बनवण्याचे काम सुरू असते. मातीच्या बैलांच्या जोडीची ंिकंमत अंदाजे १० ते २० रुपये आहे. मंगळवारी आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी आणल्याचे चित्र होते. (वार्ताहर)

Web Title: Inflation of inflation on poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.