नाशकातील गावठाण भागात कोरोनाचा शिरकाव ; फिजिकल डिस्टन्सींगला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 04:00 PM2020-06-07T16:00:08+5:302020-06-07T16:01:28+5:30

नाशिक शहरातील गावठाण भाग म्हणून ओळख असलेल्या पंचवटी परिसरातही काही दिवसांपूर्वी रु ग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतील व्यापारी, हॉटेल चालक यांच्यापाठोपाठ बाजारसमितीच्या पदाधिकाºयालाही कोरोनाची लागण झाल्याने पंचवटीतील गावठाण भागात कृषी उत्पन्न बाजारसमिती कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Infiltration of corona in Gaothan area of Nashik; Strike to physical distance | नाशकातील गावठाण भागात कोरोनाचा शिरकाव ; फिजिकल डिस्टन्सींगला हरताळ

नाशकातील गावठाण भागात कोरोनाचा शिरकाव ; फिजिकल डिस्टन्सींगला हरताळ

Next

नाशिक : शहरात कोरोना विषाणूंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून नाशिक शहरातील गावठाण भाग म्हणून ओळख असलेल्या पंचवटी परिसरातही काही दिवसांपूर्वी रु ग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतील व्यापारी, हॉटेल चालक यांच्यापाठोपाठ बाजारसमितीच्या एका पदाधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याने पंचवटीतील गावठाण भागात कृषी उत्पन्न बाजारसमिती कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
गावठाण भागातील फुलेनगर, पेठरोड, राहुलवाडी, नागचौक, सरदारचौक, मालवीयचौक दिंडोरीरोड, रामनगर यासह हिरावाडी भगवतीनगर, त्रिमुर्ती नगर, कोणार्कनगर आडगाव परिसरात कोरोना संशयित रु ग्ण आढळून आल्याने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . प्रशासनाने व्यवसायिकांना आपापले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी संबंधित दुकानदार तसेच ग्राहक यांच्याकडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही.  विविध कपडे विक्री दुकाने, भांडी दुकान, किराणा दुकान तसेच भाजीपाला विक्री हात गाड्या आणि बाजारसमितीतही मास्क बांधणे तसेच फिजिकल डिस्टन्स पाळणे अत्यंत गरजेचे असले तरी दुकानदार आणि ग्राहक यांच्यापैकी कोणीही नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टंसिंगचा पूर्ण पणे फज्जा उडाल्याचे चित्र गावठाण भागात बघायला मिळते. यामुळे  गावठाणात कोरोना संसर्ग साखळी वाढण्याची शक्यता वर्तवीली जात आहे.

Web Title: Infiltration of corona in Gaothan area of Nashik; Strike to physical distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.