घरकुल योजनेत अपात्र लाभार्थींचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:40 IST2018-11-29T23:39:22+5:302018-11-29T23:40:18+5:30
मालेगाव : म्हाळदे घरकुल योजनेच्या सदनिकांचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थींनी महापालिकेकडे अर्ज केले होते. महापालिकेने ४७ लाभार्थींना हेतूपुरस्सररीत्या अपात्र ठरविल्याच्या निषेधार्थ महिलांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी धरणे आंदोलन केले होते.

मालेगाव मनपाच्या म्हाळदे घरकुल योजनेच्या यादीतून नावे वगळल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करताना राहुलनगर भागातील महिला.
मालेगाव : म्हाळदे घरकुल योजनेच्या सदनिकांचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थींनी महापालिकेकडे अर्ज केले होते. महापालिकेने ४७ लाभार्थींना हेतूपुरस्सररीत्या अपात्र ठरविल्याच्या निषेधार्थ महिलांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी धरणे आंदोलन केले होते.
यावेळी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शहरातील राहुलनगर भागातील सर्व्हे क्रमांक ५२, ५३, ५४ मधील अतिक्रमणधारकांनी महापालिकेकडे घरकुलांसाठी अर्ज केला होता. घरकुलाच्या यादीत नावेदेखील आली होती. कागदपत्रे सादर करण्यात आली होती. तरीदेखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सररीत्या ४७ लाभार्थींना अपात्र ठरविले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.