‘निमा इंडेक्स’साठी उद्योगांची नोंदणी
By Admin | Updated: March 16, 2015 01:13 IST2015-03-16T01:12:49+5:302015-03-16T01:13:09+5:30
औद्योगिक प्रदर्शन : राज्याबाहेरील उद्योगांचाही सहभाग

‘निमा इंडेक्स’साठी उद्योगांची नोंदणी
सातपूर : नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या वतीने आयोजित ‘निमा इंडेक्स २०१५’ या औद्योगिक प्रदर्शनात राज्याबाहेरील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात स्टॉल्सची नोंदणी केल्याने नाशिकच्या उद्योगांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.
२४ ते २७ एप्रिलदरम्यान त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील ठक्कर मैदानावर ‘निमा इंडेक्स २०१५’ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सीएनसी, व्हीएमसी, एसपीएम, पॅकेजिंग या क्षेत्रातील उत्पादकांना या प्रदर्शनाचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी प्रथमच एअरकंडिशन डोम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनाचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण देशात करण्यात येत असून, या प्रदर्शनामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला हातभार लागणार असल्याची अपेक्षा निमाचे अध्यक्ष
रवि वर्मा व प्रदर्शन समितीचे अध्यक्ष एच. बी. थॉण्टेश यांनी व्यक्त केली आहे.
प्रदर्शनाच्या माहिती पत्रकाचे सादरीकरण झाल्यानंतर स्टॉल्स बुकिंगला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याची माहिती ज्ञानेश्वर गोपाळे यांनी दिली. (वार्ताहर)