उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते कंपनीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:08+5:302021-07-22T04:11:08+5:30
अंबड औद्योगिक वसाहतीतील रवींद्र सामंत आणि योगेंद्र सामंत या सामंत बंधूंच्या अनिश फार्मा इक्युपमेंट्स एका युनिटच्या उद्घाटनासाठी उद्योगमंत्री सुभाष ...

उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते कंपनीचे उद्घाटन
अंबड औद्योगिक वसाहतीतील रवींद्र सामंत आणि योगेंद्र सामंत या सामंत बंधूंच्या अनिश फार्मा इक्युपमेंट्स एका युनिटच्या उद्घाटनासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई बुधवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. सामंत बंधू कोकणातील असल्याने उद्योगमंत्री देसाई यांच्याशी असलेली जवळीक म्हणूनच केवळ सामंत बंधूंच्या युनिटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. हा खासगी दौरा असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आला नाही. या दौऱ्यात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक शैलेश राजपूत, महाव्यवस्थापक संतोष गवळी आदींसह अधिकारी उपस्थित होते. उद्योगमंत्री मुंबईहून थेट अंबड औद्योगिक वसाहतीत गेले आणि कार्यक्रम आटोपून ते पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.