शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे 
2
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 5 भारतीयांसह तब्बल 35 जणांचा मृत्यू 
3
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारत-अमेरिका सामना रद्द झाल्यास पाकिस्तानची नौका बुडणार; पावसाने वाढवली शेजाऱ्यांची धाकधुक 
4
इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य
5
अमित शाह व्यासपीठावरच संतापले? माजी राज्यपालांसोबतचे संभाषण व्हायरल; नेमकं काय घडलं
6
'पहला नशा'मध्ये पूजा बेदीचा स्कर्ट उडाला अन् ते पाहून स्पॉट बॉय...; फराह खानने सांगितला किस्सा
7
उद्धव ठाकरेंनंतर नायडूंनी 'करून दाखवलं'; जे लालू यादव, मुलायम यांनाही जमलं नाही
8
बापरे! नखांवरून समजतो मोठ्या आजाराचा धोका; 'या' संकेतांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
9
'पंतप्रधानांना त्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत नाही', राहुल गांधींचा पीएम मोदींवर घणाघात...
10
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं महायुतीकडे मागितल्या 'या' २० जागा?
11
30 चा पंच...! 'चलाख' चीनला 'सणसणीत' उत्तर, शपथ घेताच मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
Rahul Gandhi : "मी पंतप्रधान मोदींसारखा देव नाही"; राहुल गांधी अडकले धर्मसंकटात, म्हणाले...
13
नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली....
14
अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या आईचं निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट
15
'मुस्लिमांनी मदरशा, हिजाब आणि सानिया मिर्झाचा स्कर्ट...', नसिरुद्दीन शाह यांनी मांडलं परखड मत
16
Bird Flu : धोक्याची घंटा! बर्ड फ्लूचं नवं संकट; 4 वर्षांचा मुलगा ICU मध्ये दाखल, WHO ने केलं अलर्ट
17
Life Lesson: तुम्हाला त्रास देणाऱ्या, छळणाऱ्या, लोकांकडे किडा समजून दुर्लक्ष करा!- सद्गुरू
18
डोंबिवली MIDC मधून शिंदे सेनेचे लोक...; संजय राऊत यांचा हल्लाबोल
19
युक्रेनने केलेल्या हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू; रशियन लष्करात झाले होते भरती
20
८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं? 

निमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत  उद्योग विकास पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:44 AM

नाशिक इंडस्ट्रीज अँड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी हरिशंकर बॅनर्जी हे विजयी झाल्याने ते दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार आहेत. त्यांनी किशोर राठी यांचा पराभव केला, तर सरचिटणीसपदी उद्योग विकास पॅनलचे तुषार चव्हाण विजयी झाले. त्यांनी समीर पटवा आणि ज्ञानेश्वर गोपाळे यांचा पराभव केला. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या निमा निवडणुकीत सोमवारी निमा कार्यालयात सकाळी ९ वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी हरिशंकर बॅनर्जी हे विजयी झाल्याने ते दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार आहेत. त्यांनी किशोर राठी यांचा पराभव केला, तर सरचिटणीसपदी उद्योग विकास पॅनलचे तुषार चव्हाण विजयी झाले. त्यांनी समीर पटवा आणि ज्ञानेश्वर गोपाळे यांचा पराभव केला. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या निमा निवडणुकीत सोमवारी निमा कार्यालयात सकाळी ९ वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.  सिन्नर अतिरिक्त उपाध्यक्षपदी सुधीर बडगुजर विजयी झाले. त्यांनी एम. जी. कुलकर्णी यांचा पराभव केला, तर सचिवपदी संदीप भदाणे विजयी झाले. त्यांनी किरण जैन यांचा पराभव केला. सिन्नर कार्यकारिणी सदस्य पदाच्या सहा जागांवर अतुल अग्रवाल, उत्तम दोंदे, प्रवीण मिरजकर, राहुल नवले, बबन वाजे, किरण वाजे विजयी झाले. जागा एकता आणि उद्योग विकास आघाडीने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत.कार्यकारिणी सदस्यांच्या २० जागांसाठी मतमोजणी करण्यात आली. हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांच्या एकता पॅनलने १८ पैकी ११ जागांवर विजय मिळवित वर्चस्व प्राप्त केले. निवडणुकीत मतमोजणी रात्री साडेआठ वाजेपर्यंत तब्बल सहा तास चालली यात हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांच्या एकता पॅनलचे हर्षद ब्राह्मणकर, तेजपाल बोरा, गौरव धारकर, राजेश गडाख, संदीप सोनार, भाग्यश्री शिर्के, श्रीकांत बच्छाव, अखिल राठी, मनीष रावळ, भरत येवला, उदय रकिबे आदी १८ पैकी ११ उमेदवार विजयी झालेत, तर किशोर राठी-आशिष नहार पॅनलच्या २० पैकी निखिल पांचाळ व नीलिमा पाटील हे दोनच उमेदवार विजयी झालेत, तर उद्योग विकास पॅनलच्या १९ पैकी संजय महाजन, कैलाश अहिरे, एन. डी. ठाकरे, प्रदीप पेशकार, कमलेश नारंग, राजेंद्र जाधव, भाऊसाहेब रकिबे हे सात उमेदवार उमेदवार विजयी झालेत. या २० जागांवर बेळे गटाच्या उमेदवारांचा फज्जा उडाला, तर उद्योग विकास पॅनलला पाच जागांवर समाधान मानावे लागले. यात ५४ मते बाद झालीत. निमाच्या इतिहासात प्रथमच हरिशंकर बॅनर्जी यांची एकता पॅनल, तर किशोर राठी-आशिष नहार यांचीही  एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनल असे तीन पॅनल निवडणूक रिंगणात होते. कार्यकारिणी सदस्यांच्या २० जागांसाठी ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. भुतानी, विवेक गोगटे, एन. टी. अहिरे यांनी काम पाहिले.एकूण १,७९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असला तरी मतमोजणीच्या वेळी प्रत्यक्षात मतपत्रिका कमी आढळून आल्या होत्या. त्यात अध्यक्षपदासाठी १,७८७, उपाध्यक्षपदासाठी १,७९०, सरचिटणीसपदासाठी १,७९१, सेक्र टरीपदासाठी १७९१, खजिनदारपदासाठी १,७९०, सिन्नरसाठी १,७८६, कार्यकारिणी सदस्य १,७८४ अशा मतपत्रिका जमा झाल्या होत्या. याबाबत हरकत घेण्यात आली होती.४निवडणुकीतील सुमारे १०० च्यावर उमेदवारांनी, समर्थकांनी आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाºयांनी एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, भ्रमणध्वनीद्वारे प्रचार करून खूप त्रास दिला आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीत उमेदवारांना आमचा भ्रमणध्वनी देऊ नये. अशी चिठ्ठी मतपत्रिकेत वून त्रस्त झालेल्या मतदाराने आपली तीव्र भावना व्यक्त केली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMIDCएमआयडीसी