शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट
2
PMC Elections 2026: पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार
3
'त्या' वादग्रस्त मुद्द्यावर BCCI नं आखली 'लक्ष्मणरेषा'; मग खास बैठकीत नेमकं काय शिजलं?
4
अनेक वर्षांपासून बँक अकाऊंटमध्ये पैसे पडलेत? RBI 'या' पोर्टलद्वारे करा चेक, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
5
प्रत्येकाच्या खात्यात ९० लाख जमा करणार! 'या' देशातील नागरिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची थेट ऑफर 
6
Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
7
तेहरानमध्ये रक्ताचा सडा! इराणमध्ये महागाईविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण; २१७ जणांचा मृत्यू
8
"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर
9
मकर संक्रांत २०२६: संक्रांत सण असूनही त्याला 'नकारात्मक' छटा का? रंजक आणि शास्त्रीय कारण माहितीय?
10
Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर; विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य
11
आयफोन, बॉयफ्रेंडला २५ लाखांची कार, ५ कोटींवर डल्ला; हायप्रोफाईल चोरीची धक्कादायक इनसाईड स्टोरी
12
वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
13
मालेगाव मनपा निवडणुकीकडे प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पाठ; प्रचारासाठी शिंदेसेना, भाजपचा स्थानिक नेत्यांवर भर 
14
NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?
15
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा; बॉयफ्रेंडने कडाक्याच्या थंडीत रोमँटिक अंदाजात अभिनेत्रीला दिलं सरप्राईज
16
Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
17
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
18
मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
19
"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
20
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक क्षेत्रातील अपघातांना बसला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:40 IST

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्यांनी नियमित मानकांचे पालन करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणाच्या माध्यमातून कारखान्यातील कामगारांची सुरक्षा जपली जात आहेच शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे अपघातांचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसून आले आहे.

नाशिक : औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्यांनी नियमित मानकांचे पालन करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणाच्या माध्यमातून कारखान्यातील कामगारांची सुरक्षा जपली जात आहेच शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे अपघातांचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसून आले आहे.नाशिक विभागात गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने घेतल्या जाणाºया काळजीमुळे अपघातांच्या संख्येत व मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. नवीन येणारे उद्योग व तेथील स्वयंचलित यंत्रांमुळे या संख्येत घट झाल्याचे मत सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ज्या अपघातांमुळे कामगारांना झालेल्या जखमा काही काळानंतर बºया होतात तर काही अपघातात गंभीर जखमा होऊन कामगारांना कायमचे अपंगत्व अथवा मृत्यू येतो ते कायमस्वरूपी अपघात असतात. हे प्रमाण आता अत्यंत कमी झाले आहे.औद्योगिक अपघातात ‘किरकोळ अपघाताचे प्रमाण’ आणि ‘गंभीर अपघाताचे प्रमाण’ अशा दोन प्रकारांनी मोजतात. अपघातांचे प्रमाण हंगामी रोजगार, कारखान्याबाहेरील काम, कामाची बदलती जागा, अतिरिक्त शारीरिक श्रम, अपुरी जागा आदी कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असते. कोणत्याही उद्योगधंद्यात सुरक्षितता उपायांचे कठोर अवलंबन करणे हाच अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा महत्त्वाचा तोडगा असल्याचे सुरक्षा अधिकारी सांगत आहे.  मात्र मागील काही वर्षांपासून नाशिक विभागातील औद्योगिक क्षेत्रात किरकोळ अपघातांचे व अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटल्याचे सकारात्मक चित्र आहे.अशी घ्यायला हवी काळजीहंगामी कामगार भरताना कंत्राटदाराकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी बूट, हातमोजे, हेल्मेट, कोट, चष्मा आदी साहित्यांची पूर्तता कामगारांसाठी करणे आवश्यक आहे. कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षेकरिता वापरली जाणारी साधनसामग्री आणि ती वापरण्यास कामगार व कर्मचाºयांना योग्य माहिती देणे बंधनकारक करणे आवश्यक आहे.ही आहेत अपघाताची प्रमुख कारणेअपघात अनेक कारणांनी होतात. कारखान्यांत मोठमोठ्या वस्तू हलविताना होणाºया अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याची कारणे वस्तू हलविण्याचा रस्ता चांगला नसणे, अवजड वस्तू हालविताना कामगारांत सांघिक दूरदृष्टीचा अभाव असणे, वस्तूंच्या वजनाचा अंदाज नसणे अशा अनेक कारणांमुळे अपघात घडून येतात. याव्यतिरिक्त यांत्रिक अवजारे हाताळताना किंवा अवजड वस्तू कामगारांच्या अंगावर पडून अपघात होतात.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रथम कंत्राटी कामगारांना सुरक्षेबाबत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या कंत्राटदारालाही याबाबत प्रशिक्षण देणे महत्त्वाचे ठरते. तसेच प्रत्येक कारखान्याने आस्थापनेपासूनच तेथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कामगारांना कामावर घेण्याआधी कामाबाबत संपूर्ण माहिती पुरविणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्याला कामात कुठलाही अडथळा येणार नाही.- देवीदास गोरे,  सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक