औद्योगिक वसाहत बनली डंपिंग ग्राउंड

By Admin | Updated: August 24, 2016 01:42 IST2016-08-24T01:31:15+5:302016-08-24T01:42:54+5:30

ठिकठिकाणी कचरा : महापालिका-एमआयडीसीचे दुर्लक्ष; उद्योजक संघटनांचे मौन

Industrial Colony Becomes Dumping Ground | औद्योगिक वसाहत बनली डंपिंग ग्राउंड

औद्योगिक वसाहत बनली डंपिंग ग्राउंड

गोकुळ सोनवणे ल्ल सातपूर
महानगरातील बांधकामांचा मलबा, घरातील बिनकामाचे साहित्य, घनकचरा सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्याच्या कडेला व मोकळ्या भूखंडांवर सर्रास टाकला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी डंपिंग ग्राउंड तयार झाले आहेत. महानगरपालिका आणि एमआयडीसी यांच्या वादामुळेच औद्योगिक क्षेत्र या डंपिंग ग्राउंडच्या विळख्यात सापडले असल्याचा आरोप औद्योगिक संघटनांकडून केला जात आहे.शहरात ठिकठिकाणी जी काही बांधकामे सुरू आहेत तेथील बांधकामाचा मलबा, घनकचरा, ओला घनकचरा, प्लॅस्टिकचा कचरा औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या भूखंडांवर आणि रस्त्याच्या कडेला सर्रास टाकला जात आहे. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. शहरातील बांधकामाच्या मलब्याची विल्हेवाट अनधिकृतपणे लावली जात आहे. त्याचा परिणाम डंपिंग ग्राउंडमध्ये होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सातपूर-अंबड येथील औद्योगिक वसाहती या कचऱ्याच्या विळख्यात सापडल्या आहेत. हा कचरा रोखायचा कोणी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण महानगरपालिका आणि एमआयडीसी यांना लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे.
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील या डंपिंग ग्राउंडसदृश कचऱ्याच्या ढिगांमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. मोकाट जनावरे या ठिकाणी मुक्तपणे वावरतात. कचऱ्याच्या ठिकाणी अवैध धंदे बिनधास्त चालतात. रस्त्याने जाणाऱ्या कामगारांना अडवून त्यांची लूटमार केली जाते. या डंपिंग ग्राउंडमुळे औद्योगिक वसाहतीचा विद्रुप चेहरा बाहेरील लोकांना पहावयास मिळत आहे. उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या औद्योगिक संघटनादेखील मूग गिळून बसल्या आहेत.

Web Title: Industrial Colony Becomes Dumping Ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.