औद्योगिक वसाहतीतील पोलीस गस्तीचा फज्जा!

By Admin | Updated: November 9, 2015 00:34 IST2015-11-09T00:33:09+5:302015-11-09T00:34:43+5:30

आश्वासन हवेत : पहिल्याच दिवशी आठ लाखांची रोकड लंपास

Industrial colonial police patrol! | औद्योगिक वसाहतीतील पोलीस गस्तीचा फज्जा!

औद्योगिक वसाहतीतील पोलीस गस्तीचा फज्जा!

नाशिक : अंबड व औद्योगिक वसाहतींमध्ये दिवाळीत कडक पोलीस बंदोबस्त व गस्तीद्वारे तेथील चोऱ्या रोखण्याचे पोलिसांचे प्रयत्न फोल ठरले आहेत़ दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका बेकरीच्या पत्र्याचे छत उचकटून चोरट्यांनी सुमारे आठ लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई नाक्यावरील गायकवाडनगरच्या तियारा अपार्टमेंटमधील रहिवासी पवन ठाकूरदास चांदवाणी (३१) यांची सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर १०० मध्ये बाबासाई बेकरी आहे़ शुक्रवारी (दि़ ६) सायंकाळी पावणेसात ते शनिवारी (दि़७) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी या बेकरीच्या छताचा पत्रा उचकटून, तसेच पीओपी सिलिंग तोडून पहिल्या मजल्यावरील कार्यालयामध्ये प्रवेश केला़
यानंतर कंपनीच्या कार्यालयातील लॉकर तोडून चोरट्यांनी ७ लाख ९५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ या प्रकरणी चांदवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, या घटनेमुळे सातपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जाते आहे़ पोलीस आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही गस्तीबाबत पोलीस जागरुक नसल्याची तक्रार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Industrial colonial police patrol!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.