वाहनाच्या धडकेत इंदिरानगरच्या युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 10, 2017 17:22 IST2017-07-10T17:22:58+5:302017-07-10T17:22:58+5:30
भरधाव कारच्या धडकेत जखमी झालेल्या राजीवनगर येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

वाहनाच्या धडकेत इंदिरानगरच्या युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भरधाव कारच्या धडकेत जखमी झालेल्या राजीवनगर येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ बाबासाहेब वामन भदरंगे (३०) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे़
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास राजीवनगर वसाहतीजवळील रस्त्यावर बाबासाहेब भदरंगे हा मित्रांसमवेत गप्पा मारत होता़ त्यावेळी भरधाव कारने या गप्पा मारत उभे असलेल्यांना जोरदार धडक दिली़ यामध्ये भदरंगे व त्याचा मित्र सिद्धार्थ तुकाराम आंबोरे (३१, रा. राजीवनगर वसाहत) हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले़ या दोघांवर उपचार सुरू असताना बाबासाहेब भदरंगे याचा मृत्यू झाला. या अपघाताची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, कारचालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़