दुचाकीच्या धडकेत इंदिरानगरचा तरुण ठार
By Admin | Updated: February 10, 2017 00:25 IST2017-02-10T00:25:28+5:302017-02-10T00:25:36+5:30
दुचाकीच्या धडकेत इंदिरानगरचा तरुण ठार

दुचाकीच्या धडकेत इंदिरानगरचा तरुण ठार
नाशिक : अज्ञात दुचाकीच्या धडकेत इंदिरानगरमधील २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि़८) मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील साईप्रीतम हॉटेलजवळ घडली़ जितेंद्र भीमराव निकम (रा़ निवास सोसायटी, कमोदनगर, इंदिरानगर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र निकम हा रात्री बारा वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच १५, इएल २३८१) साईप्रीतम हॉटेलसमोरून जात असताना अज्ञात दुचाकीने त्यास धडक दिली़ यामध्ये डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला़