इंदिरानगरला महिलेची पोत खेचली
By Admin | Updated: February 10, 2016 00:27 IST2016-02-10T00:20:12+5:302016-02-10T00:27:13+5:30
इंदिरानगरला महिलेची पोत खेचली

इंदिरानगरला महिलेची पोत खेचली
इंदिरानगर : सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या चेतनानगर येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास घडली़
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रिया सचिन शेवाळे (३९) यांच्या नात्यातील एकाचा सराफ लॉन्समध्ये सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता़ या कार्यक्रमानंतर घरी जाण्यासाठी त्या रस्त्यावर उभ्या असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे चार तोळ्याची सोन्याची पोत खेचून नेली़
या प्रकरणी शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विवाह समारंभासाठी सुदर्शन लॉन्स येथे आलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत खेचून नेल्याची घटना घडली होती़ सातत्याने चेन स्रॅचिंगच्या घटना घडूनही यावर नियंत्रण मिळविण्यास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अपयशी ठरत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ (वार्ताहर)