इंदिरानगरला महिलेची पर्स खेचली
By Admin | Updated: November 28, 2015 23:00 IST2015-11-28T22:59:35+5:302015-11-28T23:00:03+5:30
इंदिरानगरला महिलेची पर्स खेचली

इंदिरानगरला महिलेची पर्स खेचली
इंदिरानगर : रस्त्याने पायी जाणाऱ्या विवाहितेस धक्का मारून तिच्याकडील पर्स खेचून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.२७) दुपारी वासननगरमध्ये घडली़ या परिसरातील रचना योगेश नीळकंठ या घराजवळून पायी जात होत्या़ त्यावेळी पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यांना धक्का देऊन त्यांच्याकडील पर्स खेचून पळ काढला़ या पर्समध्ये मोबाइल, तीन हजार रुपयांची रोकड, एटीएम कार्ड असा सुमारे सहा हजार रुपयांचा ऐवज होता़