इंदिरानगरला रस्त्यावर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:14 IST2021-05-13T04:14:35+5:302021-05-13T04:14:35+5:30

बुधवारी (दि. १२) दुपारी बारा वाजेपासून कडक निर्बंध लावण्यात आल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या विरोधात इंदिरानगर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास ...

Indiranagar on the road | इंदिरानगरला रस्त्यावर शुकशुकाट

इंदिरानगरला रस्त्यावर शुकशुकाट

बुधवारी (दि. १२) दुपारी बारा वाजेपासून कडक निर्बंध लावण्यात आल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या विरोधात इंदिरानगर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकरसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रसत्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळे वडाळा- पाथर्डी रस्ता, कृष्णा चौक ते राणेनगर चौफुली, गजानन महाराज मार्ग, श्रीराम चौक ते राणेनगर चौफुली, पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा रस्ता, ज्ञानेश्वर नगर, दामोदर नगर, चेतना नगर, राणे नगरसह परिसरातील‌ मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद झाल्या होत्या. यावेळी दुकानांवर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी सुरक्षित अंतर न ठेवणे आणि मास्कचा वापर न केल्याने त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Web Title: Indiranagar on the road