इंदिरानगरला बॅँकेवर दरोडा नव्हे तर पोलिसांचे ‘मॉकड्रील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 05:16 PM2019-07-03T17:16:57+5:302019-07-03T17:21:15+5:30

दरोडा पडल्याच्या पोस्ट सोशलमिडियावरून व्हायरल होत असल्या तरी हा कुठल्याहीप्रकारचा दरोडा नसून पोलिसांचे मॉकड्रील असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वत: जाहीर केले आहे.

Indiranagar is not a robbery at the bank, but the police's 'MockDril' | इंदिरानगरला बॅँकेवर दरोडा नव्हे तर पोलिसांचे ‘मॉकड्रील’

इंदिरानगरला बॅँकेवर दरोडा नव्हे तर पोलिसांचे ‘मॉकड्रील’

Next
ठळक मुद्देपोलिसांकडून मिळणारा जलद प्रतिसाद हा दरोडा नसून रंगीत तालीम

नाशिक : इंदिरानगर येथील बापु बंगला येथे असलेल्या एका बॅँकेवर दरोडा पडल्याच्या पोस्ट सोशलमिडियावरू न व्हायरल होत असल्या तरी हा कुठल्याहीप्रकारचा दरोडा नसून पोलिसांचे मॉकड्रील असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वत: जाहीर केले आहे.
कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून नियमितपणे पोलिसांनी दरोड्याच्या घटनांवेळी पोलिसांची सज्जता दाखवून तत्पर प्रतिसाद देत मॉकड्रील राबविले जात आहे. नागरिकांनी सोशलमिडियावरून कुठल्याहीप्रकारच्या अफवा पसरवू नये, असे आवाहन उपआयुक्त अमोल तांबे यांनी केले आहे.
दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांकडून मिळणारा जलद प्रतिसाद या मॉकड्रीलच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने नांगरे पाटील यांनी सांगितले. हा दरोडा नसून रंगीत तालीम असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांंनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

Web Title: Indiranagar is not a robbery at the bank, but the police's 'MockDril'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.