शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर ई ट्रेड शॉपी मॉल सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 19:01 IST

नाशिक : गुंतवणुकीवर बँकेपेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी ई शॉपीच्या सात संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार तक्रारीसाठी पुढे येत असून सुरक्षेच्या कारणास्तव ई शॉपी मॉलला कुलूप लावण्यात आले आहे़ दरम्यान, इंदिरानगर पोलिसांनी या संचालकांची माहिती जमा करण्याचे व शोध घेण्याचे काम सुरू केले आहे़

ठळक मुद्देगुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

नाशिक : गुंतवणुकीवर बँकेपेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी ई शॉपीच्या सात संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनीगुन्हा दाखल केल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार तक्रारीसाठी पुढे येत असून सुरक्षेच्या कारणास्तव ई शॉपी मॉलला कुलूप लावण्यात आले आहे़ दरम्यान, इंदिरानगर पोलिसांनी या संचालकांची माहिती जमा करण्याचे व शोध घेण्याचे काम सुरू केले आहे़

गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेव नगरमधील अंकीत लिरील हर्ट सोसायटीतील रहिवासी सुशील पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ८ फेबु्रवारी २०१८ ते २० आॅगस्ट २०१८ या कालावधीत संशयित मुकेश पाटील, ज्ञानेश्वर सीताराम पाटील, सुधाकर घोटेकर, सागर नांद्रे, दिनेश बावीस्कर, रवी त्रिपाठी व जफर यांनी संगनमत करून ई शॉपी ट्रेड कंपनी स्थापन केली़ इंदिरानगरमधील बापू बंगल्याशेजारील कंपनीचे कार्यालय सुरू करून बँकेपेक्षा जास्त लाभाचे अमिष दाखविले़ या संचालकाच्या अमिषाला बळी पडलेल्या पाटील यांनी ई शॉपीमध्ये १२ लाख ५३ हजार ६०० रुपयांची गुंतवणू केली़ मात्र,संचालकांनी पाटील यांनी गुंतवूविलेली रक्कम व त्यावरील लाभांश न देता या रकमेचा अपहार करून फसवणूक केली़

ई ट्रेड शॉपीच्या संचालकांनी केवळ नाशिक शहर व जिल्ह्यातीलच नव्हे तर धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचीही फसवणूक केल्याचे समोर येत आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने ई शॉपी मॉल सील केला आहे़ दरम्यान, मंगळवारी लोकमतच्या प्रमुख अंकात प्रसिद्ध झालेल्या ई शॉपीची फसवणुकीची बातमी गुंतवणूकदारांनी सोशल मीडीयावर व्हायरल केली असून तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे़पोलीस ठाण्यात संपर्क साधाई शॉपीच्या गुंतवणूकदारांमध्ये नाशिकसह अन्य जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांचाही समावेश असल्याचे समोर येते आहे़ त्यामुळे या कंपनीने त्या ठिकाणी कार्यालये वा मॉल सुरू केले आहेत का? संचालक कुठे आहेत? याबाबत माहिती घेतली जाते आहे़ ई शॉपीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झालेल्या नागरिकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा़

टॅग्स :crimeगुन्हेNashikनाशिकPoliceपोलिस