इंदिरानगर गुन्हे शोध पथकावर दुचाकीस्वार हल्लेखोरांकडून दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 05:00 PM2019-11-28T17:00:06+5:302019-11-28T17:02:28+5:30

नाशिक : दोघा मोबाईलचोरांना इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या. संशयित चोरट्यांची वैद्यकिय तपासणी करून जिल्हा रूग्णालयातून पोलीस ...

Indiranagar crime detection team stabbed by two-wheeler attackers | इंदिरानगर गुन्हे शोध पथकावर दुचाकीस्वार हल्लेखोरांकडून दगडफेक

इंदिरानगर गुन्हे शोध पथकावर दुचाकीस्वार हल्लेखोरांकडून दगडफेक

Next
ठळक मुद्देदगडफेक करणारे संशयित आरोपींचे साथीदार आहेत का ?तर हल्लेखोरांचा पाठलाग करणे शक्य झाले असतेअंबड पोलीस ठाण्याच्या कारागृहात घेऊन जात होते.

नाशिक : दोघा मोबाईलचोरांना इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या. संशयित चोरट्यांची वैद्यकिय तपासणी करून जिल्हा रूग्णालयातून पोलीस त्यांना अंबड पोलीस ठाण्याच्या कारागृहात घेऊन जात होते. यावेळी दोघा दुचाकीस्वारांनी पोलिस वाहनाचा पाठलाग करून वाहनावर दगडफेक केली. सुदैवाने वाहनाच्या चालकाला दगड लागला नाही, अन्यथा वाहन उलटून मोठा अपघात घडला असता, असे उत्तमनगर परिसरातील काही नागरिकांनी सांगितले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून मोबाईलवर बोलत चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या हातातून बळजबरीने मोबाईल हिसकावण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या अधारे सापळा रचून दोघांना अटक केली. या दोघांना बुधवारी (दि.२७) रोजी जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करून रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी दोन्ही संशियत आरोपींना उत्तमनगर येथील महाविद्यालय समोरून अंबड पोलीस ठाण्याच्या कारागृहात घेऊन जात होते. यावेळी पोलीस वाहनावर चालकाच्या बाजूने दुचाकीस्वारांनी येत दगड भिरकावले. यामुळे वाहनाची काच फुटली. सुदैवाने चालकाचे नियंत्रण सुटले नाही, यामुळे वाहन उलटले नाही. वाहनात बसलेले पोलीस कर्मचारी राजेश निकम, रियाज शेख, भगवान शिंदे यांना कोणत्याहीप्रकारची दुखापत झाली नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हे शोध पथकाच्या वाहनावर दगडफेक करणारे संशयित आरोपींचे साथीदार आहेत का याबाबत पोलीस पुढचा तपास करत आहेत.

...तर पाठलाग शक्य होता
पोलीस वाहनावर दगडफेक करणाºया संशयित गुन्हेगारांचा पाठलाग करणे पोलिसांना शक्य झाले असते; मात्र या गुन्हे शोध पथकाकडे असलेली क्वालिस जीप (एम.एच१५ अ‍ेअ‍े ५०५५) ‘खटारा’ असल्याने वाहनचालकाला जीप हल्लेखोरांच्या दिशेने दामटविता आली नाही. या जीपचा वेग अत्यंत कमी आणि इंजिन फारसे चांगले नसल्याने वाहनचालकाने जास्त वेगात जीप धाडण्याचा धोका पत्कारला नाही; कारण जीपमध्ये संशयित मोबाईल चोरांसह अन्य कर्मचारीदेखील होते; मात्र कदाचित इंदिरानगर गुन्हे शोध पथकाला चांगल्या दर्जाचे वाहन उपलब्ध करून दिलेले असते तर कदाचित दुचाकीस्वार हल्लेखोरांचा पाठलाग करणे शक्य झाले असते.

Web Title: Indiranagar crime detection team stabbed by two-wheeler attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.