गुंडगिरीमुळे इंदिरानगरवासीय हैराण

By Admin | Updated: August 9, 2015 22:47 IST2015-08-09T22:46:32+5:302015-08-09T22:47:53+5:30

गुंडगिरीमुळे इंदिरानगरवासीय हैराण

Indiranagar Awasthi Haraan due to bullying | गुंडगिरीमुळे इंदिरानगरवासीय हैराण

गुंडगिरीमुळे इंदिरानगरवासीय हैराण

इंदिरानगर : पाथर्डीगाव व पाथर्डी फाटा परिसरातील वाढत्या गुंडगिरीच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सराईत गुन्हेगारांकडून केली जाणारी मारहाण, त्यामध्ये तलवार व कोयता, चॉपर यांचा होत असलेल्या वापरामुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण झाली आहे़
पाथर्डीगावात सुमारे आठ हजार लोकवस्ती असून, त्यामध्ये कामगार व शेतकरीवर्गाचा समावेश आहे़ या परिसरातील काही गुंडांनी भाजीविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यामध्ये दहशत निर्माण केली असून, त्यांच्याकडून पन्नास रुपयांपासून तर ३०० रुपयापर्यंत वसुली केली जात असल्याची माहिती आहे़ तसेच जे विक्रेते पैसे देणार नाही त्यांना धमकी तसेच शिवीगाळ केली जाते़ काही दिवसांपूर्वीच गुंडांनी रिक्षा जाळण्याचाही प्रयत्न केला होता़
दोन दिवसांपूर्वीच एका रिक्षाचालकावर मद्यप्राशन केलेल्या युवकांनी तलवार, कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे़ तसेच इंदिरानगर परिसरातील विविध चौकांमध्ये झालेल्या हाणामाऱ्यांमध्येही हत्यारांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे़ या गुंडांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता असून, इंदिरानगर पोलिसांनी त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़ (वार्ताहर)

Web Title: Indiranagar Awasthi Haraan due to bullying