बाजारपेठांतील कांदा भाव कमी होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 09:26 PM2020-10-15T21:26:59+5:302020-10-16T01:54:48+5:30

सटाणा : सध्या प्राप्तिकर विभागाने जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांतील कांदा व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची तपासणी सुरु केल्याने व्यापाऱ्यांसह शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. आजच्या घडीला कांद्याचे भाव स्थिर असले तरी प्राप्तीकरच्या भीतीने व्यापाºयांच्या खरेदीवर परिणाम होऊन दोन दिवसात भाव कमी होण्याचे संकेत मिळत आहेत .

Indications of declining onion prices in the markets | बाजारपेठांतील कांदा भाव कमी होण्याचे संकेत

बाजारपेठांतील कांदा भाव कमी होण्याचे संकेत

Next
ठळक मुद्देव्यापाºयांच्या गोदामांवर प्राप्तीकर विभागाची नजर अद्याप पडली नाही

सटाणा : सध्या प्राप्तिकर विभागाने जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांतीलकांदा व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची तपासणी सुरु केल्याने व्यापाऱ्यांसह शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. आजच्या घडीला कांद्याचे भाव स्थिर असले तरी प्राप्तीकरच्या भीतीने व्यापाºयांच्या खरेदीवर परिणाम होऊन दोन दिवसात भाव कमी होण्याचे संकेत मिळत आहेत . सटाणा व नामपूर बाजार समितीत कांदा खरेदी करणाºया व्यापाºयांच्या गोदामांवर प्राप्तीकर विभागाची नजर अद्याप पडली नसली तरी त्यांना मात्र धडकी भरली आहे. गुरु वारी (दि.१५) सटाणा व नामपूर बाजार समिती आवारात सात ते आठ हजार क्विंटल इतकी कांदा आवक होती तर सटाणा बाजार समिती आवारात कांद्याला सर्वाधिक दर प्रती क्विंटल ५५०० रु पये तर सरासरी ४७०० ते ४८०० रूपये होता. नामपूर मध्ये सर्वाधिक ५२०० रु पये तर सरासरी ४५०० ते ४६०० रूपये प्रती क्विंटल दर होते. प्राप्तीकर विभागाकडून तपासणी सुरू असली तरी कांद्याचे भाव स्थिर होते . मात्र या तपासणी सत्रामुळे व्यापाºयांसह शेतकºयांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीतीमुळे व्यापार्यांचा कांदा खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, कांदा खरेदी कमी झाल्यास त्याचे भावावर देखील परिमाण होतील असे व्यापाºयांनी संकेत दिले आहेत.
कोट.....
प्राप्तीकर विभागाच्या तपासणी सत्रामुळे व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे. मागणीनुसार आम्ही कांदा खरेदी करत असून जाचक निर्बंध लादल्यास त्याचा आपोआपच खरेदीवर परिमाण होईल .खरेदी कमी झाल्यास त्याचे परिणाम शेतकºयांना भोगावे लागतात .त्यामुळे आमच्या बद्दल नाराजी तयार होते शासनाने कांदा खरेदी विक्र ी व्यवहारात अडथळे निर्माण होणार नाहीत आणि त्याचा फटका शेतकºयांना बसणार नाही याची काळजी घ्यावी .
- श्रीधर कोठावदे ,कांदा व्यापारी, सटाणा

Web Title: Indications of declining onion prices in the markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.