अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत
By Admin | Updated: June 2, 2016 00:24 IST2016-06-01T22:18:12+5:302016-06-02T00:24:34+5:30
भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण : वाहतुकीस अडथळा

अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत
सिडको : येथील त्रिमूर्ती चौक व परिसरात सकाळ व सायंकाळच्या वेळी भाजीपाला व हातगाडी व्यावसायिक रस्त्यातच बसून आपला व्यवसाय थाटत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊन अपघात होतात. याबाबत वाहतूक पोलिसांनी व्यावसायिकांना व्यवसाय करताना अतिक्रमण करून व्यवसाय न करता आपल्या दिलेल्या जागेतच व्यवसाय करावा, याबाबत थेट संपर्क साधून आवाहन केले.
सिडको तसेच परिसरातील मुख्य चौक तसेच रस्त्यांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातही घडत आहे. याबाबत अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना वाहतूक शाखा पोलिसांच्या वतीने प्रबोधन करण्यात आले. पोलीस उपायुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांनी ही मोहीम हाती घेतली. त्रिमूर्ती चौकात मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून भाजीपाला, फळविक्रेते व हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याच भागात शाळादेखील असल्याने शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होते व यामुळे अनेकदा अपघातही झाले. वरील सर्व गोष्टींचा विचार करून नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने व्यावसायिकांना अतिक्रमण करून व्यवसाय न करता दिलेल्या जागेतच व्यवसाय करावा असे आवाहन करण्यात आले. या आवाहनास विक्रेत्यांनीदेखील प्रतिसाद देत काही विक्रेत्यांनंी स्वत:हून त्यांचे अतिक्रमण काढले. सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेर्पंत ही मोहीम राबविण्यात आली. (वार्ताहर)