शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात समान वीजदर लागू करण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 20:07 IST

राज्यातील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीत निमातर्फे विविध प्रश्न मांडण्यात आले. त्यात शासकीय मालकीचे मोकळे भूखंड एमआयडीसीकडे हस्तांतरित केल्यास उद्योगांसाठी असलेल्या जागेची अडचण दूर

ठळक मुद्देबैठक : अजित पवार यांच्याशी उद्योजकांची चर्चाग्रामपंचायतीतर्फे किमान दर आकारण्यात यावा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यातील असमान वीजदरप्रश्नी संबंधित विभाग व मंत्रालयाशी समन्वय साधून राज्यभरात एकच वीजदर कसा लागू करता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिल्याची माहिती निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली.

राज्यातील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीत निमातर्फे विविध प्रश्न मांडण्यात आले. त्यात शासकीय मालकीचे मोकळे भूखंड एमआयडीसीकडे हस्तांतरित केल्यास उद्योगांसाठी असलेल्या जागेची अडचण दूर होऊन नाशिकमध्ये नवीन व मोठी औद्योगिक गुंतवणूक येण्यास चालना मिळेल व उद्योजकांना रास्त दरात भूखंड उपलब्ध होईल, राज्यातील असमान वीजदरामुळे राज्यांतर्गत स्पर्धेस येथील उद्योजकांना तोंड द्यावे लागत आहे, अंबड अग्निशमन केंद्रात कायमतत्त्वावर कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात यावा, ग्रामपंचायतीतर्फे किमान दर आकारण्यात यावा व वसुलीचे अधिकार एमआयडीसीला देण्यात यावे, फ्लॅटेड बिल्डिंगमधील गाळ्यांचे दर अधिक असून ते कमी करण्यात यावेत, ईएसआयसीतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा निकृष्ट दर्जाच्या असून कामगार रुग्णांना उपचारासाठी मुंबई अथवा अन्यत्र जाण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे कामगारांकडून शुल्क घेऊन त्याचा उपयोग होत नाही असे निदर्शनास आणून दिले. या सर्व समस्यांबाबत मुख्यमंत्री व उद्योगांशी निगडित सर्व विभागांशी समन्वय साधून औद्योगिक प्रश्नांवर मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन तसेच उद्योग सचिव उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिकAjit Pawarअजित पवारMIDCएमआयडीसी