आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय जलतरण संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 16:29 IST2018-09-20T16:29:12+5:302018-09-20T16:29:26+5:30
नाशिक : थायलंड येथील फुकेट येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिंन स्विमिंग या स्पर्धेसाठी भारताचा संघ रवाना झाला. नाशिकचा जलतरणपटू स्वयम पाटील याचा या संघात समावेश आहे. भोपाळचे दोन व नागपूरचा एक असा चार खेळाडूंचा हा संघ आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय जलतरण संघ रवाना
नाशिक : थायलंड येथील फुकेट येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिंन स्विमिंग या स्पर्धेसाठी भारताचा संघ रवाना झाला. नाशिकचा जलतरणपटू स्वयम पाटील याचा या संघात समावेश आहे. भोपाळचे दोन व नागपूरचा एक असा चार खेळाडूंचा हा संघ आहे.
येथील सावरकर जलतरण तलावाचे व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांची भारतीय संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे. अंडर वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन आॅफ इंडियातर्फेही निवड करण्यात आली आहे. दि. २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा होणार आहे. स्वयम पाटील या खेळाडूला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक महानगरपालिकेच्या सावरकर जलतरण तलावावरील सर्व सभासद यांनी स्वयमला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मदत केली. महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वयमला शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेत रशिया, जपान, चीन, इजिप्त, पोलंड आदी २१ देशांचा सहभाग आहे. स्वयम डाउन सिन्ड्रम या आजाराने त्रस्त असूनही सर्वसाधारण खेळाडूंच्या स्पर्धेत तो पात्र ठरला आहे. स्वयम ११ वर्षांचा आहे. या जागतिक स्पर्धेतील तो सर्वात लहान खेळाडू आहे. यापूर्वी त्याने जलतरण या खेळात विविध प्रकारचे जागतिक रेकॉर्ड केले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया, लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, वण्डर बुक आॅफ इंटरनॅशनल रेकॉर्ड आदी रेकॉर्ड त्याने केले आहे.
कॅप्शन : थायलंड येथील फुकेट येथे होणाºया आंतरराष्ट्रीय फिंन स्विमिंग या स्पर्धेसाठी भारताच्या संघासमवेत संघ व्यवस्थापक हरी सोनकांबळे व स्वयम पाटील. (२०स्विमिंग न्यूज)