शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

खुर्च्या कमी पडल्याने खासदारांची भारतीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 16:17 IST

दुष्काळाचा आढावा : वीज वितरण कंपनीवर रोष व्यक्त

ठळक मुद्देबहुतांशी पाणीटंचाई ही मानवनिर्मित असल्याने प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना सुचवून कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार पवार यांनी दिल्या

पेठ : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर शपथविधीचीही वाट न पाहता खासदार डॉ. भारती पवार यांनी दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला आहे. पेठ तालुक्यातील दुष्काळासंदर्भात बोलाविलेल्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांसाठी खुर्च्या कमी पडल्याचे दिसताच पवार यांनी जमिनीवर भारतीय बैठक मारत कामकाज सुरू केले.पेठ येथे तहसिल कार्यालयात पाणी टंचाईबरोबरच विविध समस्यांचे अंतरंग जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुक्यात तिव्र पाणीटंचाई असलेल्या गांगोडबारी (धाब्याचा पाडा), वांगणी , जांभुळमाळ , उंबरपाडा, घुबडसाका,आमडोंगरा, बोरीचीबारी, अंबापूर, शिंगदरी आदी गावांमधील ग्रामस्थ, ग्रा.पं. सदस्य यांनी पाणी टंचाईबाबतची व्यथा मांडली. हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र एकच ध्यास घ्यावा लागत असल्याने जनजीवन विस्कळीत होत असल्याचे विदारक चित्र यावेळी दिसुन आले. मात्र बहुतांशी पाणीटंचाई ही मानवनिर्मित असल्याने प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना सुचवून कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार पवार यांनी दिल्या . लघु पाटबंधारे( स्थानिक स्तर ) यांचे कार्यालय कायम कुलूपबंद असते. धरणातील पाण्याचा विसर्ग करतांना होणारी अनियमितता, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष यावर ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतला. लघुपाटबंधारे विभागाच्या अहवालात सुसुत्रता नसल्याने योजनांना मंजुरी कधी मिळाली? योजनेचा कालावधी, खर्च झालेला निधी याचा कुठलाही मेळ बसत नसल्याने पाणी टंचाई दूर करण्यातली अनास्था उघड झाली, वीज वीतरण कंपनीचे दिवसभर भारनियमन असल्याने महिलांना रात्री पाणी भरावे लागत असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत, सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशीराम वाघमारे , सदस्य विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, उपविभागीय अधिकारी संदीप आहेर , प्रभारी गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे , तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष पद्माकर कामडी , कांतिलाल राऊत, रामदास वाघेरे , संतोष् डोमे , रघुनाथ चौधरी , हेमंत कोरे , नामदेव चौधरी , छबीलदास चोरटे , निवृत्ती गालट, माधुरी गाडगीळ , शितल राहणे , जयश्री काळे, यांचेसह तालुक्यातील विभागप्रमुख, अधिकारी, सरपंच , ग्रामसेवक, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते .

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ