भाजप खासदारांच्या गटात अपक्ष बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 00:24 IST2019-12-05T00:23:45+5:302019-12-05T00:24:04+5:30
कळवण : भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मानूर गटाच्या पोटनिवडणुकीत बुधवारी (दि. ४) माघारीच्या दिवशी नाट्य रंगले आणि भाजपबरोबरच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या गीतांजली अर्जुन पवार यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला. त्यानंतर, झालेल्या नाट्यमय घडामोडीत अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने गीतांजली पवार यांची बिनविरोध निवड झाली. या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून राष्टÑवादीची जागा अपक्षाने घेतली असली तरी, पवार कुटुंबीयातील आणखी एका सदस्याने राजकारणात पदार्पण केले आहे.

भाजप खासदारांच्या गटात अपक्ष बिनविरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मानूर गटाच्या पोटनिवडणुकीत बुधवारी (दि. ४) माघारीच्या दिवशी नाट्य रंगले आणि भाजपबरोबरच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या गीतांजली अर्जुन पवार यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला. त्यानंतर, झालेल्या नाट्यमय घडामोडीत अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने गीतांजली पवार यांची बिनविरोध निवड झाली. या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून राष्टÑवादीची जागा अपक्षाने घेतली असली तरी, पवार कुटुंबीयातील आणखी एका सदस्याने राजकारणात पदार्पण केले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या डॉ. भारती पवार यांनी मानूर जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक जाहीर झाल्यानंतर पवार कुटुंबीयांतून पुन्हा उमेदवार देण्यास राष्टÑवादीतून विरोध झाला होता. (पान ७ वर)